Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे, आरोग्य मंत्र्यांचे वक्तव्य

राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे  आरोग्य मंत्र्यांचे वक्तव्य
Webdunia
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (17:12 IST)
सातत्यानं वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा आता कमी होत आहे. शिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचे दिलासादायक वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.  मात्र तरीही धोका टळलेला नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची, असल्याचे त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 
 
आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, राज्यात 1 नोव्हेंबरला कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 16 लाख 83 हजार 775 इतकी होती. तर, सक्रिय रुग्णसंख्या 1 लाख 25 हजार 109  इतकी होती. 5 डिसेंबरला एकूण रुग्णसंख्या 18 लाख 47 हजारांवर होती. तर, उपचार घेणाऱ्या अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या 82 हजार 849 इतकी कमी झाली होती. ही एकंदर कडेवारी पाहता कोरोनातून सावरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची बाब समोर येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेटवर भर दिला. राज्यातील रिकव्हरी रेट हा 94 टक्क्यांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील कोरोना रुग्णांचा ‘डबलिंग रेट’ही 350 दिवसांवर गेल्याचं टोपे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

IND vs AUS : भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून केलं बाहेर

LIVE: लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार 3 हजार रुपये

लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार 3 हजार रुपये, आदिती तटकरे यांची घोषणा

जिओ, एएमडी, सिस्को आणि नोकिया यांनी ओपन टेलिकॉम एआय प्लॅटफॉर्मसाठी हातमिळवणी केली

जामनगर येथे पंतप्रधानांनी 'वंतारा' या प्राणी संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले

पुढील लेख
Show comments