Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना काळातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक : नाना पटोले

कोरोना काळातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक : नाना पटोले
Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (07:14 IST)
कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील सर्वच क्षेत्रात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक छोटे मोठे उदयोग धंदे बंद झाल्याने आर्थिक प्रगतीचा वेग चांगलाच मंदावला आहे. पण एवढं असतानासुद्धा कृषी क्षेत्रातील कामगिरी चांगली झाली आहे. अत्यंत कठीण परिस्थीतीतसुद्धा राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणले आहे. शुक्रवारी राज्याचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा पाहणी अहवाल सादर करताना ते बोलत होते.
 
“कोरोना महासाथीदरम्यान केंद्राचे आर्थिक असहकार्य, आरोग्याच्या सोयीसुविधा न पुरवणे तसेच १ लाख ५६ हजार कोटींचा महसूल कमी असतानाही ३१ लाख ४ हजार शेतकऱ्यांना १९ हजार ८४७ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. १० लाख लिटर दुध रोज घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. सेवा व उत्पादन क्षेत्राला महामारीचा फटका बसला असतानाही महाराष्ट्रातील मेहनती शेतकऱ्यानी ११.७ टक्क्याचा विकास दर ठेऊन अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात उभारी दिली. तसेच एका गोष्टीचा अभिमान आहे कि संकटात संधी समजून पेट्रोल डिझेलवर कोणत्याही प्रकारचा कर लावला नाही,” असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
 
“अनलॉक करत असताना उद्योग लवकरात लवकर सुरु झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करुन गावी गेलेल्या मजुरांना परत महाराष्ट्रात येण्यास प्रोत्साहित करण्यात आले. लवकरच सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या अडचणी जरी दिसल्या तरी येणाऱ्या वित्तीय वर्षात केंद्राचे असहकार्य असतानाही महाविकास आघाडी सरकार दमदार कामगिरी करुन राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणेल असे संकतेसुद्धा नाना पटोले यांनी दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

LIVE: हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट

मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments