Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभ्यासाच्या तणावातून तरुणीची आत्महत्या

अभ्यासाच्या तणावातून तरुणीची आत्महत्या
Webdunia
शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (15:41 IST)
औरंगाबाद : उषा कृष्णाचंद्र चौधरी (१८ रा. शंभूनगर) असे बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचे नाव असून तिने परीक्षेच्या तणावातून राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.३) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.  
 
उषा ही देवनागरी परिसरातील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिचे वडील कृष्णाचंद्र हे फरशी बसवण्याचे काम करतात, तर आई घरकाम करते. तिला एक लहान भाऊ आहे. दरम्यान उषाला एमबीबीएस करायचे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. दरम्यान शुक्रवारी (ता.३) वडील नियमित कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास उषाचा लहान भाऊ बाहेर खेळत असताना उषाने आईला अभ्यास करण्यासाठी पेपर आणण्यासाठी दुकानात पाठवले. आई पेपर आणण्यासाठी गेली असता उषाने घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. उषाने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असा अंदाज नातेवाइकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कॉमेडियन कुणाल कामरावर खार पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल

मुंबई: विलेपार्ले येथे क्रेननेखाली चिरडून महिलेचा मृत्यू

LIVE:26/11 हल्ल्यातील नायकाच्या सन्मानार्थ स्मारक बांधले जाणार

26/11 हल्ल्यातील नायकाच्या सन्मानार्थ स्मारक बांधले जाणार,महाराष्ट्र सरकारने जाहीर केले

मुंबई पोलिसांशी बोलण्याचा सल्ला देत कुणाल कामराकरिता विशेष सुरक्षेची मागणी संजय राऊतांनी केली

पुढील लेख
Show comments