rashifal-2026

आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2017 (12:14 IST)

गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

सौराष्ट्र, कच्छ भागात उष्णतेची लाट कायम असून, तेथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढले आहे़ गुजरात, पश्चिम राजस्थान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल २२ शहरांचे कमाल तापमान ४० अंशावर नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंशावर स्थिर असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. मुंबईत उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून, आर्द्रतेमध्येही वाढ होत आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईला लवकरच नवीन महापौर मिळणार

अजित पवार विमान अपघातानंतर फडणवीस सरकार सक्रिय, सरकारी 'फ्लाइंग बेड्स'च्या दुरुस्तीसाठी 6 कोटी रुपये मंजूर

कार्लोस अल्काराझ पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचला, कठीण सामन्यात झ्वेरेव्हचा पराभव केला

T20 विश्वचषकासाठी सामनाधिकाऱ्यांची घोषणा, दोन बांगलादेशी पंचांचा समावेश; चार भारतीयांना संधी

डोनाल्ड ट्रम्प कॅनडावर 50 टक्के नवीन कर लादणार

पुढील लेख
Show comments