Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सनबर्न म्हटले की अमलीपदार्थ हा गैरसमज : चार दिवशीय सनबर्न महोत्सवाचे वागाथोर येथे उद्घाटन

Webdunia
गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (08:39 IST)
म्हापसा :सनबर्न म्हटले की अमलीपदार्थ हा गैरसमज आहे. आताच या महोत्सवाचे उद्घाटन झाले आहे. येथे स्टॉल्स उभारण्यात आले मात्र येथे कुणालाच ड्रग्स आढळून आले काय? जो पर्यटक ड्रग्जसाठी येतो मग तो सनबर्नसाठी असो वा इतर महोत्सवासाठी. असे राज्याचे नाव बदनाम करणारे पर्यटक आम्हाला नको आहे. या महोत्सवातून गोव्याची प्रतिमा बदलायची आहे त्यासाठीच पहिल्यांदाच ईडीएममध्ये गोव्याची संस्कृती सर्वांना पहायला मिळणार आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
 
सनबर्न महोत्सवाचे रितसर उद्घाटन केल्यावर मंत्री खंवटे बोलत होते. यावेळी आमदार डिलायला लोबो, सनबर्नचे संचालक तथा सीईओ शैलेंद्र सिंग, करण सिंग, मॅरी कुणाल उपस्थित होते.
 
राज्यात ड्रग्सचा विषय नवीन नाही. ड्रग्ज घेणारी व्यक्ती ड्रग्ज प्राशन करण्यासाठी एखाद्या इव्हेंटची वाट पाहात नसते तर कधीही आणि कुठेही ड्रग्ज प्राशन करते. राज्याला चांगल्या पर्यटकांची गरज असून अवैध्य कृत्यांत गुंतलेल्या लोकांवर कारवाई करण्यासाठी आपली पोलीस यंत्रणा सक्षम आणि सज्ज आहे, परंतु ड्रग्जचे एकमेव कारण पुढे करीत आपण सनबर्नसारखा महत्वाकांक्षी महोत्सव रोखू शकत नाही, सनबर्नमुळे राज्याच्या पर्यटनात मोठी वृद्धी झालेली आहे. नवोदित कलाकारांसाठी पर्वणी आणि संधी देणारा हा महोत्सव सर्व प्रकारची दक्षता घेऊन यंदा साजरा करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.
 
या महोत्सवात गोव्यातील कलाकारांचाही समावेश आहे. तसेच गोवा फुडसाठी प्रसिद्ध असल्याने येथे विविध जेवणाचे स्टॉल्स उभारण्यात आले आहे.
 
संकेत मांद्रेकर यांचे कौतुक
सनबर्न महोत्सवात सहभागी स्थानिक कलाकार संकेत मांदेकर यांनी सर्वांसमक्ष काही मिनीटांतच काळय़ा फलकावर सफेद रंगाचा वापर करीत हुबेहूब मंत्री रोहन खंवटे यांची प्रतिमा तयार करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मंत्री रोहन खंवटे तसेच आमदार डिलायला लोबो यांनी संकेतचे अभिनंदन केले.
 
आमदार डिलायला लोबो यांनी सनबर्न महोत्सवात गोव्याला पहिल्या दिवशी प्रतिनिधीत्व दिल्याबद्दल मंत्री रोहन खंवटे यांचे अभिनंदन करीत यामुळे गोवा आपली कला या महोत्सवातून पेश करीत जगप्रसिद्ध होणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. शैलेंद्र सिंग यांनी आभार मानले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments