rashifal-2026

राष्ट्रवादी भाजपला कदापि पाठिंबा देणार नाही- सुप्रिया सुळे

Webdunia
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (15:37 IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला कदापि पाठिंबा देणार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उस्मानाबादमध्ये सुप्रिया सुळे आल्या होत्या यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेचे मंत्री 18 फेब्रुवारी रोजी राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार अस्थिर होईल. त्यामुळे सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का याबाबत प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळेंनी आमचा भाजपला पाठिंबा नसल्याचे सांगितले. शरद पवार दोन वर्षांपूर्वी पाठिंबा देण्याचे बोलले होते. त्यानंतर एकदाही बोलले नाहीत. आम्ही कोणाबरोबरही जाणार नाही, असे पवार काही दिवसांपूर्वी बोलले होते, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, विदर्भ स्टील कॉरिडॉर बनणार; विकासाचा रोडमॅप जाहीर

ट्रम्प यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा, गोपनीय कागदपत्रे प्रकरणात विशेष वकिलांच्या अहवालावर कायमची स्थगिती

IOC अ‍ॅथलीट्स कमिशनच्या उपाध्यक्षपदाचा बिंद्रा यांचा कार्यकाळ संपला

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर 8 सामन्यासाठी टीम इंडिया चेन्नईत पोहोचली

LIVE: संभाजीनगरमधील बेकायदेशीर बॅनरवर कडक कारवाई

पुढील लेख
Show comments