Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षला राज्यमंत्रीपदाचा दर्जा

Webdunia
शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश काशिनाथ हावरे यांना राज्य सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  यापूर्वी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. 
 
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट देशातील सर्वांधिक श्रीमंत मंदिर ट्रस्टपैकी एक आहे. या ट्रस्टची वार्षिक उलाढाल ७०० कोटी रुपये इतकी असून २१०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. तसेच प्रत्येक दिवशी २ कोटी रुपयांचे उत्पन्न देणगीच्या स्वरुपात ट्रस्टला प्राप्त होते. ट्रस्टने राज्यातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि औरंगाबाद येथील ४ वैद्यकीय महाविद्यालयांना ७१ कोटी रुपयांचे दान देण्याचा निर्णय नुकताच ट्रस्टने घेतला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments