Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकात पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीची मृतदेहासमोर तंत्रपूजा सुरू

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (10:22 IST)
कौटुंबिक त्रासाला कंटाळून नाशिकात 11 सप्टेंबर रोजी पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नवनाथ घायवटे असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. पत्नीने पतीचा अंत्यसंस्कार करण्याऐवजी मृतदेहा समोर तंत्र मंत्र पूजा विधी केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नाशिक हादरले आहे. 

नाशिक रोड परिसरात कौटुंबिक वादातून कंटाळून एकाने आत्महत्या केली.पत्नीने पतीच्या लटकलेल्या मृदेहासमोर तंत्र मंत्र पूजे चे साहित्य मांडून पूजा विधी करायला बसली. नवनाथ यांनी ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी त्यांच्याघरात दुर्गाष्टमीची पूजा होती. पती पत्नी मध्ये काही कारणावरून वाद झाला आणि कंटाळून नवनाथ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यू नंतर पत्नी ने पूजा मांडल्याचे समोर आले. 

या घटनेचा व्हिडिओ समोर येताच एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात पत्नी मानसिक आजारी असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. याच कारणामुळे त्याने हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

प्राथमिक दृष्टया हे तंत्र मंत्र , जादू टोणा ची शक्यता वाटत होती मात्र चौकशी नंतर मयताची पत्नी मानसिक आजारी असल्याचे समोर आले. तिने या मुळे पूजा मंडळी होती. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

नाशिकात पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीची मृतदेहासमोर तंत्रपूजा सुरू

पुण्यात मिरवणुकीत हाय टेंशन वायरला ध्वजाचा रॉड लागून विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

गाझामधील शाळेवर इस्रायली हवाई हल्ल्यात सात ठार

उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेच महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री होणार! बॅनर झळकले

मयंक अग्रवालच्या संघाने जिंकले दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद

पुढील लेख
Show comments