Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मशानात अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून मांत्रिकाकडून पूजा

Webdunia
मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (11:43 IST)
साताऱ्यातील सुरूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीची स्‍मशानभूमीत पूजा केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून ही पूजा करण्यात आली. परंतु स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
 
स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीची स्‍मशानभूमीत पूजा होत असल्याचा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी तसेच नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. 
 
या स्मशानभूमीत एक लाल शर्ट घातलेल्या तंत्रीकाने एका अल्पवयीन तरुणीवर बाहेरचे लागरी झाले असे सांगितल्याने स्माशानभूमीत हळदीकुंकवाचे गोलाकार रिंगण आखून त्याशेजारी अंडी, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवून मुलीस केस मोकळे सोडून बसविल्याचे निदर्शनास आले. ग्रामसंस्थानी या बाबत मुलीसोबत आलेल्या नातेवाइकांना हटकले असता आमच्या मुलीस बाहेरची बाधा झाली असून ती काढण्यासाठी व कोंबडा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत असे यावेळी सांगण्यात आले. गोंधळ होत असल्याचे बघून या लोकांनी स्माशानभूमीतून पळ काढला.
 
हा धक्‍कादायक प्रकार वाई तालुक्‍यातील सुरूर गावाच्या स्‍मशानभूमीत घडला आहे. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments