Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाकरेंचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले- आशिष शेलार

Webdunia
बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (09:18 IST)
"आम्हाला प्रतिआव्हान देण्याआधी तुमचे हात स्वच्छ आहेत का? तुमचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, हा आरोप मी जाणीवपूर्वक करत आहे", असं विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं आहे.
 
"मी उद्धवजींना नम्रपणे विनंती करीन. आदित्यजींच्या नादी लागून या प्रकरणात पडू नका. आमच्यावर दगड मारायचा विचार कराल तर शंभर बोटं तुमच्याकडे येणार आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
 
कमला मिल कम्पाऊंडमध्ये अनधिकृत बांधलेल्या हुक्का पार्लर आणि बारमध्ये २०१७ रोजी आग लागून १४ मुंबईकरांचा मृत्यू झाला. देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला होता. पण उद्धव ठाकरेंनी नोव्हेंबर २०२० मध्ये आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन हा गुन्हा मागे घ्यायला लावला आणि मालकाला मोकळं केलं असं शेलार म्हणाले.
 
"जगविख्यात डॉक्टर अमरापूरकर हे मनपाच्या भोंगळ कारभाराचे बळी पडले. पावसाच्या पाण्यात चालत जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. याच वरळीच्या बीडीडी चाळीमधील चार महिन्याच्या चिमुरड्याला नायर रुग्णालयात वेळेत उपचार मिळाले नाही. बाळ रडून रडून मृत्यूमुखी पडलं. आदित्य ठाकरे त्यांना बघायलाही गेले नाहीत", असं शेलार म्हणाले.
 
मुंबईकरांच्या भावना समजून घेणारे सरकार सत्तेवर बसले आहे. आज कोळीवाड्यातले प्रश्न सुटले आहेत. मुंबईकरांचे आशीर्वाद मिळाले तर पुढच्या पाच वर्षात मुंबईचे सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही असा शब्द सरकारतर्फे देतो असं शेलार म्हणाले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments