Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महापुरुषांबद्दल इतिहासाची मोडतोड करून लिखाण करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचा : छगन भुजबळ

Webdunia
सोमवार, 29 मे 2023 (20:58 IST)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,'इंडिक टेल्स' नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल 'इंडिक टेल्स' च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा मी तीव्र निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.
 
त्यांनी पुढे म्हटले आहे की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात असल्याचे म्हटले आहे.
 
त्यांनी म्हटले आहे की, एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे.ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व हस्तक्षेप करणार नाही

एक राष्ट्र, एक निवडणूक' लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

ग्रँडमास्टर डी गुकेश जगज्जेता बनला, बक्षीस म्हणून इतके कोटी रुपये मिळाले

पुढील लेख
Show comments