Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाजन बंधूंच्या सी टू स्काय मोहिमेला सुरुवात

Webdunia
सोमवार, 1 एप्रिल 2019 (10:06 IST)
महाजन बंधू फाऊंडेशनतर्फे आयोजित 'सी टू स्काय' या अनोख्या आणि साहसी मोहिमेला रविवारी (दि. 31 मार्च) मुंबईतून उत्साहात सुरुवात झाली.
 
मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्र करण्यासाठी स्काय जोश उच्च आहे!
 
महाजन ब्रदर्स आणि मुंबईच्या रहिवाशांनी या मोहिमेला उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनंतर रेलीची सुरुवात केली.
 
हरीश बैजल सर (आयपीएस), मेन्टर आणि संस्थापक नाशिक सायकलीस्ट्स, डॉ दीपा केन (अध्यक्ष आयएसए मुंबई) इंडियन सोसाइटी ऑफ अॅनेस्टाइलॉजी, डॉ. नवीन मल्होत्रा ​​(सचिव आयएसए) इंडियन सोसाइटी ऑफ अॅनेस्टाइलॉजी, उदय निरगुडकर (लोकमत 18 मुख्य संपादक पश्चिम विभाग), डॉ. बाळाभास्कर (अध्यक्ष आयएसए इंडिया) इंडियन सोसाइटी ऑफ अॅनेस्टाइलॉजी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
 
त्यानांतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाजन बंधूंचे नाशिक येथे पाथर्डी फाटा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. तेथून त्र्यंबक रोड येथील बीएलव्हीडी हॉटेल पर्यंत नाशिक सायकलिस्टने डॉ. महाजन बंधूंसोबत राईड केली. येथे सीपीआर ट्रेनिंगचे प्रात्यक्षिक केल्यानंतर साहसवीर धुळे शहराकडे रवाना झाले. यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, डॉ. मनीषा रौदळ, तसेच सायकलिस्ट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
दिवंगत क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्माराज बाम आणि नाशिकचा सायकलप्रेमी दिवंगत जसपालसिंग विर्दी (अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन) यांना समर्पित असणाऱ्या या मोहिमेत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून प्रत्येक सामान्य मनुष्यालाही माहीत असावी या उद्देशाने सीपीआर CPR (Cardio Pulmonary Resuscitation) तंत्राविषयी  जनजागृती करणे - जीवन संजीवनी उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मनुष्याला जीवन वाचविण्यासाठी सज्ज प्रशिक्षित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
 
अशी असेल मोहीम : मुंबई (समुद्र सपाटीपासून) ते काठमांडू पर्यंत सायकलिंग + ट्रेकिंग (एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत) + गिर्यारोहण (माउंट एव्हरेस्ट सर करणे 29028 फूट, स्काय लेवल)
 
चला बदल करूया आणि जीवन वाचवूया... सीपीआर तंत्राची (जीवन संजीवनी) माहिती घेऊया...
 
असे असेल मोहिमेचे वेळापत्रक :
A) सायकल प्रवास आणि जीवन संजीवणीची माहिती देण्यात येणार आहे अशा ठिकाणांची यादी अशी आहे :
 
31 मार्च : गेटवे ऑफ इंडिया, मुंबई
 
सकाळी 6 वाजता : जीवन संजीवनी CPR सीपीआर तंत्राची माहिती आणि प्रात्यक्षिक
सकाळी ठीक 7 वाजता प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात
 
साडेआठ वाजता सरदार तारा सिंग उद्यान, मुलुंड, ठाणे
 
दुपारी एक वाजता पाथर्डी फाटा, नाशिक येथे आगमन, पुढे दीड वाजेपर्यंत हॉटेल बीएलव्हीडी, त्र्यंबकेश्वर रस्ता पर्यंत सायकल रॅली, तेथे सीपीआर प्रात्यक्षिक, ठीक अडीच वाजता धुळ्याकडे प्रयाण
 
रात्री साडेआठ वाजता धुळे शहर आणि पुढे इंदूर येथे 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता आगमन तसेच सीपीआर प्रात्यक्षिक आणि मुक्काम.
 
2 एप्रिल रोजी इंदूर येथून पुढील प्रवास. भोपाळ येथे दुपारी 2 वाजता पोहचून तेथे सीपीआर प्रात्यक्षिक, सागर येथे मुक्काम
 
3 एप्रिल रोजी सागर येथून झाशी कडे प्रयाण, झाशी येथे सीपीआर प्रात्यक्षिक, आणि पुढे कानपुर पर्यंत राईड करून शहरात मुक्काम
 
4 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता सीपीआर प्रात्यक्षिक करून लखनऊ कडे रवाना. लखनऊ येथे दुपारी 2 वाजता पुन्हा सीपीआर प्रात्यक्षिक आणि पुढे बस्ती येथे मुक्काम
 
5 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता प्रवास सुरू करून नेपाळची सीमारेषा. येथून प्रवासादरम्यान बुतवाल आणि भारतपूर येथे सीपीआर प्रात्यक्षिक करून काठमांडू येथे मुक्काम
 
6 एप्रिल सकाळी 10 वाजता काठमांडू येथे सीपीआर प्रात्यक्षिक
 
B) ट्रेकिंगचे वेळापत्रक
 
8 एप्रिल रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे पोहचण्यासाठी ट्रेकिंगला सुरुवात, पुढील 9 दिवसात एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे पोहचण्याचा प्रयत्न
 
C) काही काळ थांबून एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर वातावरण अनुकूल होताच एव्हरेस्ट शिखर सर करण्यास प्रारंभ
 
C) Acclimatisation and climbing to the summit as we get a favourable weather window. 
बेस कॅम्प येथेपर्यंत ट्रेकिंग करताना आणि बेस कॅम्प येथील मुक्कामादरम्यान येथील स्थानिक नेपाळी नागरिकांना, शेर्पा अर्थात सीमाभागात राहणाऱ्या व गिर्यारोहणात पारंगत असलेल्या तसेच एव्हरेस्ट सर करण्यासाठी जगभरातून आलेल्या सर्व गिर्यारोहकांना सीपीआर/ जीवन संजीवणीचे प्रात्यक्षिक करून दाखवणार.
 
या उपक्रमाविषयी प्रत्येक माहिती महाजन बंधू सायकलिस्ट या महाजन बंधू फाउंडेशनच्या अधिकृत फेसबुक पानावरुन दिली जाणार आहे. या रॅलीमध्ये कोणास कुठल्याही शहरातून सहभागी व्हायचे असल्यास त्यासाठी गूगल फॉर्मची लिंक देऊन त्याठिकाणी नोंदणी करून सहभागी होता येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना सीपीआर (जीवन संजीवनी) प्रात्यक्षिक पूर्ण करण्याबद्दल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

मंत्रिमंडळ विस्तारावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पोलिस नागपुरात दाखल

हत्तीने चिरडल्याने घरात झोपल्या दोन बहिणींचा मृत्यू

LIVE: आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू

महाराष्ट्रात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज शिवसेनेच्या आमदाराने राजीनामा दिला

पुढील लेख
Show comments