Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकच्या गळती दुर्घटनेचे कारण...; 22 मृतांची नावे

Webdunia
बुधवार, 21 एप्रिल 2021 (22:12 IST)
नाशिक मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुदैवी मुत्यृ झाला. यामध्ये एकूण १२ पुरूष व १० महिलांचा समावेश आहे. तर ११ रुग्ण हे ऑक्सिजन बेडवरील व ११ रुग्ण हे व्हेंटीलेटर बेडवरील असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
 
डॉ. झाकिर हुसेन हे १५० बेडचे कोविड रुग्णालय असुन येथे आज सकाळी १० वाजता १५७ रुग्ण दाखल होते. त्या १३१ रुग्ण ऑक्सिजनवर, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर व ६१ रुग्ण क्रिटिकल होते.
 
या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासाठी १३ KL चा लिक्विड ऑक्सिजन टॅंक Taiyo Nippon या कंपनीकडून टॅंक हा १० वर्षाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आलेला आहे.
 
त्याची देखभाल दुरुस्ती व यामध्ये भरावयाचा लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही या कंपनीकडे आहे. दुपारी सुमारे १२.३० वाजता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे टॅंकची पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजुला गळती आढळून आली.त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसुन आले. ही घटना रुग्णालयातील डॉक्टर यांनी तात्काळ माझ्या निदर्शनास आणून दिली.
 
ही बाब लक्षात येताच गळती दुरुस्तीसाठी शहरातील निखील गॅसचे मालक शेटे व पिनॅकल कंपनीचे इंजिनीयर यांना तातडीने घटनास्थळी बोलाविण्यात आले. फायर टेंडर मधून पाणी फवारणी करून ऑक्सिजन गळतीची जागा तज्ञांनी शोधली.
 
गळतीची पहाणी करुन गळती होणारा पाईपचा भाग दुरुस्त करुन पुन्हा जोडणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी सुमारे ०१.४५ ते ०२.०० वाजता सुरळीत करण्यात आला.दरम्यानच्या काळात Taiyo Nippon या कंपनीचा लिक्वीड ऑक्सिजनचा टँकर दैनंदीन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यासाठी स्थळावर आलेला होता व त्यामधून लिक्वीड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आले. या कालावधीमध्ये ऑक्सिजन पुरवठयाअभावी दुर्देवाने 22 रुग्णांचा मुत्यृ झाला.
 
अ.क्र. वॉर्ड क्र. रुग्णाचे नांव रुग्ण दाखल दिनांक वय/लिंग
 
1 C1+S.R. अमरदीप नगराळे 13/4/2021 74/पु.
 
2 भारती निकम 16/04/2021 44/स्त्री
 
3 श्रावण रा. पाटील 11/04/2021 67/पु.
 
4 मोहना दे. खैरनार 14/04/2021 60/स्त्री
 
5 मंशी सु. शहा 16/04/2021 36/पु.
 
6 पंढरीनाथ दे. नेरकर 11/04/2021 37/पु.
 
7 C2 सुनिल झाळके 17/04/2021 33/पु.
 
8 सलमा शेख 06/04/2021 59/ स्त्री
 
9 प्रमोद वालुकर 08/04/2021 45/ पु.
 
10 आशा शर्मा 17/04/2021 45/ स्त्री
 
11 भैय्या सय्य्द 19/04/2021 45/पु.
 
12 C3 प्रविण महाले 28/03/2021 34/पु.
 
13 सुगंधाबाई थोरात 18/04/2021 65/ स्त्री
 
14 हरणाबाई त्रिभुवन 06/04/2021 65/ स्त्री
 
15 रजनी काळे 18/04/2021 61/ स्त्री
 
16 गिता वाघचौरे 03/04/2021 50/ स्त्री
 
17 बापुसाहेब घोटेकर 12/04/2021 61/पु.
 
18 C4 वत्सलाबाई सुर्यवंशी 20/04/2021 70/ स्त्री
 
19 नारायण इरनक 20/04/2021 73/ पु.
 
20 C5 संदिप लोखंडे 19/04/2021 37/पु.
 
21 बुधा गोतरणे 19/04/2021 69/पु.
 
22 वैशाली राऊत 18/04/2021 46/ स्त्री
 
पाच रुग्ण इतरत्र हलवले
 
मनपाच्या नविन बिटको रुग्णालयात ४ रुग्ण व शहरातील खाजगी रुग्णालयात १ रुग्ण हलविण्यात आले आहेत. दरम्यान, इतर ठिकाणचे डयुरा सिलेंडर व जंबो सिलेंडर मागवून त्यांच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा सुरु ठेवून रुग्णांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. सदयस्थितीत रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत चालू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख