Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्र सरकारकडून कोकणातील नागरिकांना योग्य मदत पुरवणार

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (22:21 IST)
राज्यात मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.  अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच केंद्र सरकारकडून कोकणातील नागरिकांना योग्य मदत पुरवण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे. बचावकार्यासाठी आवश्यक टीम पाठवणार असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारने तात्काळ नागरिकांसाठी योग्य मदत पुरवली पाहिजे असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत कोकणातील नागरिकांना केंद्र सरकारकडून मदत देणार असल्याची माहिती दिली आहे. नारायण राणे यांनी म्हटलय की, अतिशय गंभीर परिस्थिती या अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे. राज्यात जवळपास ३५० मिली पाऊस पडलेला आहे. यावर उपाय आहे की, त्या ठिकाणी हेलकॉप्टरने लोकांना काढणे, बोटीने काढणे, योग्य जागी नागरिकांना पोहचवून त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे.
 
मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी संवाद साधला आहे. त्वरित सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर किंवा बोटी किंवा अन्य लागणारी मदत करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी दिलं आहे अशी माहिती राणेंनी दिली. तसेच दुसरे मंत्री यादव यांच्याशी बोललो असून वेळ पडली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल परंतु संबंधित मंत्र्यांशी बोलणं झाले असून मदत करण्याचे आश्वासन या मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.
 
रत्नागिरी आणि सिंधुदूर्गाच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी नारायण राणे यांनी संवाद साधला आहे. या दोन्ही कलेक्टरसोबत संपर्क केल्यानंतरच केंद्रीय मंत्री नित्यानंद यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली आहे. यावर त्यांनी संपुर्ण मदतीची शाश्वती दिली असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

मनू भाकर-गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न

LIVE: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांची मोठी मागणी, बीडबाहेर सुनावणी व्हावी

मुंबईत 8 पाकिस्तानींना 20 वर्षांची शिक्षा, अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी झाली होती अटक

करिअरवरून मतभेद, नागपूरमधील 25 वर्षीय इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याने आई-वडिलांची हत्या केल्याचा आरोप

शिर्डी : भक्तांनी साईंच्या चरणी 203 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केला

पुढील लेख
Show comments