Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री यांना मिळाली पत्रकारिता पदविका, बनले पत्रकार

Webdunia
गुरूवार, 11 मे 2023 (20:48 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७७ टक्के गुणांसह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना वृत्तपत्रविद्या व जन संज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
 
मुख्यमंत्र्यांनी हा पदविका अभ्यासक्रम ऑगस्ट २०२१ मध्ये विशेष प्रावीण्यासह अर्थात ७७.२५ टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे झालेल्या या सोहळ्याप्रसंगी कुलगुरू पाटील यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील उपस्थित होते.
 
यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाची बी.ए. पदवी विशेष प्रावीण्यासह पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षण क्रमही विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या यशाने विद्यापीठाच्या लौकिकात भर : पाटील
 
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लौकिकात मुख्यमंत्री शिंदे यांच्या या यशाने भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

भूमिगत मेट्रो मार्ग सुरू होण्यापूर्वी या 11 स्थानकांची नावे बदलण्यात आली

ओवेसींच्या ताकदीचे उदाहरण रस्त्यावर दिसले, AIMIM च्या मुंबई मोर्चाचा उद्देश काय?

कोण आहेत एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे? बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षयच्या डोक्यात गोळी झाडली

तिरुपतीनंतर सिद्धिविनायकाच्या प्रसादावरून गोंधळ! लाडूच्या पाकिटांवर उंदीर सापडले, व्हिडिओ व्हायरल

नवीन मोबाईलची पार्टी न दिल्याने मित्रांनी केला अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून

पुढील लेख
Show comments