Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हृदयद्रावक : ट्रकखाली येऊन शिक्षिक आई सोबत मुलाचा जागीच मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (07:50 IST)
जळगावमध्ये चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत कर्तव्याला जात असतानां राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू असल्याने रस्त्यावर पसरलेल्या खडीवर स्कुटी घसरून स्कूटी चालक शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी (वय ३७) व स्कुटीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा लावंण्य (वय दहा) हे पुढे चालत असलेल्या ट्रकच्या मागील चाकात दाबले गेले. त्यात दोघे माय लेक जागीच ठार झाले.ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल धारागीर दरम्यान हॉटेल फाउंटन पासून थोड्या अंतरावरघडली.
 
याबाबत समजलेली माहिती अशी की  एरंडोल येथील विद्या नगरमधील रहिवासी कृष्णकांत मुरलीधर चौधरी यांच्या पत्नी कविता कृष्णकांत चौधरी या एम एच १९ डी बी ८७७९ क्रमांकाच्या स्कुटीने त्यांचा मुलगा लावंण्य याला सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ने चंदन बर्डी (जळू) येथे शाळेत जाण्यासाठी निघाल्या वाटेवर त्यांनी त्यांच्या वाहनात पेट्रोल भरले, त्यानंतर पुढे निघाले असता. अवघ्या पाच मिनिटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पसरलेल्या खडीवर त्यांची वाहन घसरली व पुढे चालणाऱ्या जि.जे २६, टी ८२६४ या क्रमांकाच्या ट्रकला धडकले व सदर शिक्षिका मुलासह ट्रकच्या मागच्या चाकात अडकून त्यांचा अंत झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: गुरुवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली

लिलाव झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार, फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

वसईमध्ये कंपनी मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Sarpanch Santosh Deshmukh murder आरोपांदरम्यान मंत्री धनंजय मुंडे म्हणाले आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

नाशिक जिल्हयात वडील-मुलाने मिळून केली शेजाऱ्याची हत्या

पुढील लेख
Show comments