Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेच्या नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला,चौकशी दरम्यान तब्बेत बिघडली

Webdunia
सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (13:29 IST)
अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी सकाळी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरावर छापा टाकला. ईडीची टीम माजी खासदारांची चौकशी करत होती की त्यांनी सांगितले की त्यांची प्रकृती खालावत आहे, त्यानंतर केंद्रीय तपास पथकाने रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना गोरेगावच्या रुग्णालयात दाखल केले. ईडीच्या टीमने आनंदरावची तीन ते चार तास चौकशी केली आणि त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे, मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले. त्याचवेळी आनंदराव यांचा मुलगा अभिजित अडसूळ म्हणाला की तो सर्व तपासांसाठी तयार आहे. अभिजीतने असेही म्हटले आहे की या प्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने झाला पाहिजे. तपास राजकारणाने प्रेरित होऊन होऊ नये.बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आनंदरावां विरोधात तक्रार दाखल केली होती. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना हा घोटाळा झाल्याचे भाजपचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.
 
ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,आम्ही ईडी कार्यालयात आनंदराव अडसूळ यांना  घेऊन येणार होतो,मात्र त्यांची तब्येत बिघडली,त्यानंतर त्यांना गोरेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
काहीच तासाच्या चौकशी नंतर आनंदराव अडसूळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.ते सिटी को-ऑपरेटिव  बँकेचे अध्यक्ष असताना 900 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.या संदर्भात ईडी ने सोमवारी सकाळी त्यांना आणि त्यांच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले होते.मात्र त्यांनी काही वैयक्तिक कारणामुळे हजर राहण्यापासून सूट मागितली होती.ईडीचे अधिकारी त्यांच्या कांदिवलीस्थित निवासस्थानी पोहोचून त्यांची आणि मुलाची चौकशी केली.आमदार रावी राणा ने सांगितले की सिटी कॉपरेटिव्ह बँकेच्या मुंबईत 13-14 शाखा आहे. या बॅंकेत 1000 हुन अधिक खातेदार आहे.
 
कोण आहे आनंद राव अडसूळ ?
आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आहे. 1996 पासून ते सलग 5 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकले आहे.2019 मध्ये त्यांना अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा यांच्या हातून पराभव पत्करावा लागला.नवनीत कौर या प्रकरणातील तक्रारदार रवी राणा यांची पत्नी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments