Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्याने राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास दिला नकार

Webdunia
सोमवार, 2 मे 2022 (22:15 IST)
कृषी विभागाकडून दिल्या जाणार्‍या पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारांच्या मानकर्‍यांपैकी एक राजेंद्र पवार यांनी आज वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला. 
 
कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेला पुरस्कार सोहळा सोमवारी नाशिकमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात राजेंद्र पवार यांनाही पुरस्कार घोषित करण्यात आला होता. ते या सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यांनी आपल्या अनुपस्थितीचं कारण देताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला नाही.  ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले  यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं करत राज्यात अशांतता निर्माण केली त्यांच्याकडून पुरस्कार स्वीकारणं मान्य नसल्याचं म्हटलं आहे.
 
दरम्यान राजेंद्र पवार हे एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत तर आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत. 2019 चा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार राजेंद्र पवार यांना जाहीर झाला होता. नाशिक मध्ये या पुरस्कारांचे वितरण पार पडले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार,अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती ऑनलाईन होती.
 
राज्यपालांपेक्षा हा पुरस्कार राज्य सरकारच्या ज्या कृषी विभागाने दिला आहे त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वीकारणं अभिमानास्पद वाटेल असेही राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेला पुरस्कार सोहळा आज नाशिक मध्ये पार पडला. यामध्ये 2017 मधील 64 शेतकरी,2018 मधील 64 आणि2019 मधील 70 विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments