Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांनी आईला वेळोवेळी त्रास देणार्‍या बापाचा गळाच ‘घोटला’

मुलांनी आईला वेळोवेळी त्रास देणार्‍या बापाचा गळाच ‘घोटला’
Webdunia
गुरूवार, 15 एप्रिल 2021 (16:21 IST)
आईला सतत मारहाण करत, त्रास देत. या कारणावरून दोन्ही मुलांनी वडील भैरू भगवान जगताप (वय ५५) यांचा गळा आवळून खून केला. वरकुटे (ता. करमाळा) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर हा प्रकार दडपण्यासाठी आरोपींनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. परंतु, करमाळा पोलिसांनी कुशल पद्धतीने या गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी पोलिस नाईक श्रीत हराळे यांच्या तक्रारीनुसार मुलगा निखिल व अक्षय भैरू जगताप या सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अटकही झाली आहे.
 
भैरू जगताप हा पत्नी अविदा हिला सतत विविध कारणाने मारहाण करीत होता. मुले निखील व अक्षय हे आईला मारहाण न करण्याबाबत वारंवार समजावून सांगत. पण तरीही तो त्यांना जुमानत नव्हता. दरम्यान, ७ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता मुलाच्या लग्नाला मेहुणा का आला म्हणून भैरूने अविदा हिच्याशी भांडण काढले. यातून पुन्हा भैरू तिला मारहाण करू लागला. आईची आरडाओरड ऐकून तिला वाचविण्यासाठी निखील व अक्षय धावले. त्यांनी आईला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भैरू दोघा मुलानांही आवरत नव्हता. त्यामुळे त्यांनी भैरू याला ताकदीने ढकलून देत आईची सुटका केली. त्यानंतर त्या दोघांनी भैरूला पकडून दोरीने पाय बांधले. सोबतच त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास गुंडाळून तो आवळला. निखील व अक्षय या दोघांनीही भैरूला फरफटत घराच्या बाजूला असलेल्या झाडाजवळ नेले. तेथे दोरीने फास आवळून त्याला ठार मारले व गळफास लावून घेतला, असा बनाव केला.
 
दरम्यान, याप्रकरणी शेजारी, नातेवाईकांना त्यांनी बोलावून घेतले. त्याआधारे नातेवाईकांच्या साक्षीने निखील व अक्षय यांनी भैरू याच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केले. परंतु पोलिसांनी आत्महत्येची कारणमिमांसा करता घरातील भांडणाचा प्रकार चर्चेत आला. सोबतच अज्ञात व्यक्‍तीने भैरूची आत्महत्या नसून खून असल्याची माहिती करमाळा पोलिसांना दिली. या आधारे पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे, सुनिल जाधव, श्रीकांत हराळे आदींनी या प्रकरणी कसून चौकशी केली. तेव्हा खूनाचा गुन्हा उघड झाला. संशयित दोघांनीही आईला वारंवार त्रास व मारहाण करीत असल्याने बापाचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध संगनमत करुन खून केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्या दोघानांही अटक करुन न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडी मिळाली. या खूनाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तळपे करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

LIVE: हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट

मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments