Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच! मित्रांमध्ये झालेल्या वादातून युवकाचा खून…

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (08:35 IST)
नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पुन्हा एकदा युवकाचा खून झाल्याची घटना घडलीय. शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्बन नाका या ठिकाणी ही घटना घडली. या घटनेने शहरात नक्की चाललय काय? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय.विश्वनाथ सोनवणे असे या मयत युवकाचे नाव आहे. आणि मित्राच्या झालेल्या वादातून त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केलाय. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, दोन-तीन दिवसांपूर्वी रफिक शेख या तरुणाला त्याच्या एका मित्राने शिवीगाळ केली होती. या शिवीगाळ करणाऱ्या मित्राची मयत विश्वनाथ सोनवणे या मित्राने बाजू घेतली होती. याचा रफिक याला राग आला होता. काल रात्रीच्या सुमारास समशेर रफिक शेख, दीपक अशोक सोनवणे आणि आणखी दोन तीन मित्र दारू पिऊन गप्पा मारत उभे होते. त्यातच रफिक याने मागचा राग काढत इतर मित्रांसह विश्वनाथ याला मारहाण केली. रागाच्या भरात त्याच्या पोटात चाकू भोकसल्याने तो गंभीर जखमी झाला.

त्याचवेळी संशयितांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. मात्र अति रक्तस्राव झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस हवालदारांच्या सतर्कतेने संशयित आरोपी मित्रांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. गंगापूर पोलिसांनी या संशयितांना चौकशी केली असता, दोघांनी रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिली.
 
दरम्यान, नाशिक शहरात सातत्याने किरकोळ कारणातून खुनाच्या घटना घडत आहे. गेल्या चार दिवसांत ही खुनाची दुसरी घटना घडल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे..
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लाडकी बहीण: महाराष्ट्रात लागू केलेली ही योजना होती भाजपच्या मध्य प्रदेशच्या विजयातील महत्त्वाचे कारण

भारतातील 'या' राज्याला NEET का नकोय?

Ind vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 विश्वचषकाचा अंतिम सामना, जाणून घ्या कधी, कुठे होणार

Russia-Ukraine War: आता युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीय संघ पुढे आला

ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का, स्पर्धक डीपी मनू डोपिंग प्रकरणात निलंबित

सर्व पहा

नवीन

'महिलांना महिन्याला 1500 रुपये', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही नवी योजना काय आहे?

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान, संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची लोखंडी रॉडने वार करून हत्या

तेलंगणा मध्ये काचेच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार, 15 जखमी

IND vs SA Final Rules: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ICC फायनलचे नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments