Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विकृत मुलाने वडिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले

Webdunia
सोमवार, 27 एप्रिल 2020 (16:18 IST)
नागपूरमध्ये एका मुलाने वृद्ध वडिलांची निर्घृण हत्या केली. भीषण बाब म्हणजे वडिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करताना हा विकृत मुलगा बॉलिवुड सिनेमांची गाणी म्हणत होता. हा निर्घृण प्रकार करत असताना त्याला अडवणाऱ्या आई आणि बहिणीला देखील जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. अखेर पोलिसांनी त्याला त्याच्याच घरातून अटक केली असून त्याच्यावर वडिलांची हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
नागपूरच्या हुडकेश्वर भागामध्ये आरोपी विक्रांत पिल्लेवारत्याच्या कुटुंबासोबत राहातो. मात्र, त्याला कोणत्याही कारणाशिवायच प्रचंड संताप येत असे. अशाच संतापात त्याने वडिलांच्या गळ्याला जोरदार चावा घेतला. यामुळे त्यांच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मग विक्रांतने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना फरफटत व्हरांड्यात आणलं. यामध्ये त्याची आई आणि त्याच्या बहिणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चाकू दाखवून त्या दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
 
दरम्यान, वडिलांना व्हरांड्यात आणल्यानंतर विक्रांतने त्यांचं गुप्तांग कापून टाकलं. अजूनही तो प्रचंड संतापात होता. या प्रकारात त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. पण विक्रांतचा राग शांत झाला नव्हता. त्याने व्हरांड्यातच हातातल्या चाकूने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली. धक्कादायक प्रकार म्हणजे हे सगळं करत असताना विक्रांत बॉलिवुडमधल्या सिनेमांची गाणी म्हणत होता.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख