Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्याची कमाई लुटली दोघांना पोलिसांनी केले अटक

Webdunia
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (16:24 IST)
लातूर: आधीच दुष्काळ आणि इतर समस्यांना ग्रासलेल्या शेतकरी वर्गाला आता चोरांचाही समाना करावा लागत आहे. लातुरच्या बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका शेतकर्‍याचा खिसा कापून दोन लाख रुपये लांबवणार्‍या चोरट्यांना अटक केली आहे. हे दोन्ही चोरटे बीड जिल्ह्यातील असून चर्‍हाटा फाटा येथे या दोघांना लातूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख १ लाख ६५ हजा रुपयांचा ऐवज मोबाईलसह जप्त केला. 
 
२३ जानेवारी रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास उमरगा तालुक्यातील एकोंडी रोड येथील व्यापारी संतोष दहिटणे शेतमालाचे दोन लाख घेऊन पाथरी-अक्कलकोट बसमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा खिसा कापला. लातुरसे एसपी राजेंद्र माने आणि अपर पोलिस अधिकारी काकासाहेब डोळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्यावर सोपवली. त्यानुसार सपोनि सुनील रेजीतवाड, अंगद कोतवाड, राम गवारे, नामदेव पाटील, युसूफ शेख, राजाभाऊ मस्के, नागनाथ जोंधळे यांचे पथक नेमण्यात आले. सायबर सेलला मोबाईलवर चोरटे चंद्रकांत गायकवाड आणि रामकृष्ण जाधव चर्‍हाटा फाटा येथे असल्याचे समजले. त्यानुसार तपास केला असता हे दोघे अट्टल चोरटे सापडले. त्यांच्याकडून जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments