Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवभोजन थाळी २६ जानेवारीपासून सुरु होणार

Webdunia
गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ येत्या 26 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची माहिती दिली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक‍ दरम्यान त्यांनी याबाबतची माहिती दिली. शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात आणि 1 वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपयाला देण्यात येईल.
 
या विभागातंर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरणव्यवस्थेचे सक्षमीकरण करुन वाजवी दरात आवश्यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करुन देणार आहे. सार्वजनिक वितरणासाठी आवश्यक असलेली साठवणूक क्षमता आधुनिक व सक्षम करणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकेत, महिला सक्षमीकरणासाठी शिधापत्रिका कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याची निवड करणार आहे.
 
NFSAमध्ये अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति महिना 35 किलो धान्य आणि पीएचएच / एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना प्रती महिना 5 किलो प्रती व्यक्ती धान्य दिले जात आहे. याव्यतिरिक्त, शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे, विद्यार्थी वसतिगृहे,आश्रम शाळा, बालगृहे आणि कल्याणकारी संस्था यांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा केला जाईल. हे उपक्रम अधिक चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत केली  जाईल.
 
दरम्यान भुजबळ यांनी रास्त भावधान्य दुकानदारांचे सक्षमीकरण, संगणीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्थेद्वारे केरोसीन वितरण, सुधारीत धान्य वितरण प्रणाली, पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण कल्याणकारी संस्था व वसतीगृह योजना, गोदाम व्यवस्थापन, तांदुळ फोर्टीफीकेशन, शिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावा, भविष्यातील विभागाची वाटचाल, वैधमापन शास्त्र विभाग व ग्राहक संरक्षण विभागाची माहिती, विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला.

संबंधित माहिती

Pune Porsche Accident:अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, सीसीटीव्ही फुटेज वरून उघड

KKR vs SRH: अंतिम फेरी गाठण्यासाठी KKR आणि SRH यांच्यात लढत होणार!सामना कुठे आणि कोणत्या वेळी जाणून घ्या

चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

Chess : कार्लसन विजेता, विश्वनाथन आनंद तिसऱ्या स्थानावर

IPL Playoffs Schedule:IPL प्लेऑफ सामने कधी खेळले जातील हे जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय चहा दिवस, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

पुढील लेख
Show comments