Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीतील हिसडा गँगचा चोरटा निघाला राधानगरीचा !

Webdunia
सांगलीत काही दिवसापासून सलग हिसडा मारून सोन्याचे दागिने पळविणाऱ्या आणि महिला वर्गात दहशत निर्माण केलेल्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली. उत्तम राजाराम बारड हा अवघ्या तिशीतील चोरटा धामोड, ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्याच्याकडून साडेसहा तोळे सोन्यासह एक दुचाकी असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगलीतील शंभरफुटीसह मौजे डिग्रज, इचलकरंजी, जैनापूर अशा सात ठिकाणच्या चोरीची त्याने कबुली दिली आहे.
 
चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीत स्थानिक किती आणि बाहेरगावहून आलेले गुन्हेगार किती आहेत याची माहिती काढण्याची जबाबदारी आता सांगली शहर पोलिसांवर आली असून या पोलीस ठाण्याकडे त्याला वर्ग करण्यात आले आहे. हिसडा टोळीला पकडण्यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील पथक निर्माण केले आहे. जेथे जेथे हे गुन्हे घडले तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यातच हवालदार सागर लवटे आणि नाईक सागर टिंगरे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार बारड हा कुपवाड रोडवर सूतगिरणी चौकात चोरीचे दागिने विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. सूतगिरणी चौक परिसरात या पथकाने सापळा रचला त्यात उत्तम बारड अडकला. पँटच्या खिशात चोरीचे दागिने मिळाले. शिवाय मोटार सायकलही चोरीची असावी अशा पध्दतीने त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अटक करून त्याचा ताबा सांगली शहर पोलीस ठाण्याकडे देण्यात आला आहे. त्याच्याकडून एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

सर्व पहा

नवीन

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सुजाता सौनिक यांची होणार मुख्य सचिव पदी नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

New Army Chief:जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

पासपोर्ट घोटाळा मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी सीबीआयची धाड, 32 जणांवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments