Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्त्री पंतप्रधान झाली, पण सुरक्षित झाली नाही

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (12:05 IST)
'आपण स्त्रीला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षणंत्री म्हणून पाहू शकलो. पण स्वकर्तृत्वाने पुढे येणार्‍या सामान्य महिलेला सुरक्षा देऊ शकलो नाही,' अशी खंत माजी मंत्री व भाजप नेत पंकजा मुंडे यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर व्यक्त केली आहे. 
 
नागपूरधील 'ऑरेंज सिटी' रुग्णालयात उपचार घेणार्‍या हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली आहे. पीडित तरुणीच्या दारोडा गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला आहे. आरोपीला तत्काळ शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. राजकीय, सामाजिक व सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. 
 
पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंगणघाटची घटना मनाचा  थरकाप उडवणारी आहे. सुन्न आणि अपराधी वाटते. इतक शतकांमध्ये आपण स्त्रीला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षणंत्री म्हणून पाहू शकलो. पण स्वतःचे कर्तृत्व दाखवणार्‍या स्त्रीला संरक्षण देऊ शकलो नाही,' असे त्यांनी म्हटले आहे. 'पीडित तरुणीच्या कुटुंबाचे दुःख कल्पनेच्या पलीकडचे आहे. ते कधीही न भरून येणारे आहे. त्यांच्या आणि समाजाच्या मनावर ओरखडे ओढणार्‍या अशा क्रूर अहंकारी गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या मार्फत देहदंडाची शिक्षाच दिली पाहिजे,' असा संताप पंकजांनी व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments