Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रच – जयंत पाटील

Webdunia
शनिवार, 9 मार्च 2019 (17:25 IST)
महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुरू केले आहे. आज सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झाली.
 
‘’राज्यात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. त्यात कार्यकर्त्यांचे काही गैरसमज होतात, अनेक ठिकाणी मतभेद होतात. महाराष्ट्रात तसे फार काही मतभेद नाहीत. पण जे काही थोडे-फार असतील, ते सामंजस्याने सोडवण्याचे यशस्वी प्रयत्न आज झाले,’’ असे मत या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
 
सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, साताऱ्यातील सर्वच आमदार, जिल्हाध्यक्ष अशा सर्वांची बैठक आज आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि सर्वांनीच लोकसभा निवडणुकीसाठी एकदिलाने काम करण्याचे ठरवल्याचेही पाटील यांनी सांगितले. खासदार उदयनराजे भोसले यांना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments