Dharma Sangrah

महापालिकेच्या ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याच्या सॉप्टवेअरमध्ये दुरूस्ती नाही

Webdunia
मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (08:32 IST)
कोल्हापूर महापालिकेच्या ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये कोणतीही दुरूस्ती झालेली नाही. अद्यपही सर्व त्रुटी तशाच आहेत. ऑनलाईन बांधकाम प्रणाली पुन्हा सुरू होवून महिना झाला असून बांधकामाच्या मोठय़ा प्रकल्पाची फाईल सबमिट होण्याची समस्या कायम आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत दुरूस्तीसाठी अवधी घेऊन नेमके राज्य शासनाने काय केले असा सवाल बांधकाम व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.
 
महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांना सुलभ व त्रासविरहित बांधकाम परवानगी मिळावी, या उद्देशाने ऑनलाईन बांधकाम परवानगीची सुविधा सुरू केली. 5 मे 2021 पासून प्रायोगिकतत्वावर कोल्हापुरात याची अंमलबजावणी झाली. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने मोठय़ा प्रकल्पाच्या फाईली सबमिट होण्यास अडथळे निर्माण झाले. 250 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प अडकले होते. बांधकाम क्षेत्रावर परिणाम झालाच शिवाय महापालिकेचे उत्पन्नही घटले. बांधकाम व्यावसायिकांच्या शिखर संस्था असणाऱया क्रीडाईने ही बाब राज्यशासनाच्या निदर्शनास आणली. राज्य शासनाने 18 सप्टेंबर 2021 पासून ऑनलाईन बांधकाम परवानगी सक्ती शिथिल करत 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑफलाईनने बांधकाम परवानगी देण्यास मान्यता दिली. दरम्यान, संबंधित विभागाने यामधील त्रुटी दूर करण्याचे आदेशही शासनाने दिले. साडेतीन महिन्याचा अवधी घेवूनही त्रुटीत काहीही दुरूस्ती न करताच 1 जानेवारीपासून ऑनलाईननेच बांधकाम परवानगी देणे बंधनकारक केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

शरद पवार गटाला मोठा धक्का: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये सामील होणार; मोठे संकेत मिळाले

SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन

SRH vs RR : राजस्थानने हैदराबादला ४७ धावांनी हरवून आयपीएलमधून बाहेर काढले

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतही पार्थ पवार मोठे निर्णय घेत आहे, ज्येष्ठ नेते संतप्त झाले

भोंदू बाबा अशोक खरातच्या कथित कृत्यांवर आधारित मराठी चित्रपट बनणार; अभिनेत्री दीपाली सय्यद प्रमुख भूमिका साकारणार

पुढील लेख
Show comments