rashifal-2026

अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी कालमर्यादेचे बंधन नाही-राहुल नार्वेकर

Webdunia
सोमवार, 10 जुलै 2023 (21:41 IST)
आमदारांच्या अपात्रतेबाबत सुयोग्य वेळेत निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र आपण किती दिवसांत निर्णय घ्यावा याबाबत माझ्यावर कुणीही बंधन घालू शकत नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवार दि. १० जुलै रोजी स्पष्ट केले.
 
आपण नोटीसा दिलेल्या प्रत्येक आमदारांची सुनावणी घेणार आहोत. अपात्रतेबाबत मी निर्णय दिल्यावरच संबंधिताना न्यायालयात जाता येईल असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या मागणीवर सुयोग्य वेळेत निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालायने ११ मे २०२३ च्या निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालाला पुढील महिन्यात १० ऑगस्ट रोजी तीन महिने पूर्ण होतील. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार अपात्रेबाबत तीन महिन्यांत निर्णय घ्यावाच लागेल असे म्हटले आहे.
 
याबाबत शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडून ७ जुलैला शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ५३ आमदारांना अपात्रतेबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदाराला वेळ देऊन प्रत्यक्ष सुनावणी घेणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

जपानमध्ये दोन जणांवर चाकूने हल्ला, आरोपीला अटक

LIVE: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

पुण्यातील वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वी गर्भधारणा चाचणी करणे आवश्यक असल्याचा विद्यार्थिनींसाठी विचित्र आदेश

मंत्री अशोक उईके यांच्यावर ‘भूमाफिया’ असल्याचा गंभीर आरोप

15 जानेवारीला महापालिका निवडणुका, आचारसंहिता लागू

पुढील लेख
Show comments