Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एनए टॅक्स बाबत झाला 'हा' निर्णय, अभ्यास समिती झाली गठित

Webdunia
सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (21:58 IST)
अकृषिक कर (एनए टॅक्स) हा जमिनीवरील मूलभूत कर असून तो राज्याचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. राज्यात सुधारित अकृषिक प्रमाणदराच्या आधारे, अकृषिक आकारणीच्या वसुलीस देण्यात आलेली स्थगिती उठविणे, तसेच या अनुषंगिक अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्याकरिता सर्वंकष अभ्यास करुन राज्य शासनास योग्य शिफारस करण्याकरिता महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे.
 
या अभ्यास समितीमध्ये महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. भूमी अभिलेखचे जमाबंदी आयुक्त व संचालक, नाशिकचे विभागीय आयुक्त आणि कोकणचे विभागीय आयुक्त हे सदस्य असतील. तर महसूल व वन विभागाचे सहसचिव (ज- 1अ) या अभ्यास समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती अकृषिक कराच्या मार्गदर्शन सूचनांबाबत फेरविचार करणे, सुधारित अकृषिक प्रमाणदर नव्याने निश्चित करण्याबाबत विचार करणे आणि या अनुषंगिक बाबींविषयी शिफारशी करण्याचे काम करणार आहे.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments