Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Webdunia
बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (20:52 IST)
मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांना जागीच मृत्यू झाला आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास सातीवली ब्रीजवर बजरंग ढाब्यासमोर भीषण अपघात घडला आहे. गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटून गाडी दुभाजक क्रॉस करून पलिकडील मार्गिकेवर गेली होती.
 
त्यावेळी समोरून येणार्‍या ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारचालकासह तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना संस्कृती रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.
 
तसेच या अपघातातील सर्व मृत आणि जखमी राजस्थान राज्यातील आहेत. बुधवारी पहाटे मारूती स्विफ्ट कार (एच आर २० ए जी ०२२६) मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास गाडी सातिवली ब्रीजवरून बजरंग ढाब्यासमोरून जात असतान गाडीने दुभाजकाला धडक दिली.
 
गाडीचा वेग एवढा होता की गाडी दुभाजक क्रॉस करून मुंबईच्या मार्गिगेवर आली. त्यावेळी सिल्वासा येथून एक ट्रक (एमएच ४८ बीएम ५९८९) येत होता. या ट्रकने गाडीला धडक दिली.  दरम्यान अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन रुग्णवाहिकेने जखमीपैकी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला.
 
महामार्ग पोलिसांनी अपघातानंतर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी काढण्यासाठी अपघात ग्रस्त वाहने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.  याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून ट्रकचालक प्रदीप गौडला ताब्यात घेतले आहे. हा अपघात इतका भीषण होता  की यात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून लोकांची मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना

कॅबिनेट मध्ये दिसणार नवे चेहरे, 30 तारखेला होणार नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

पुढील लेख
Show comments