suvichar

तिवरे धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करा

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2019 (16:23 IST)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची मागणी
 
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्याच्या निषेधार्थ जबाबदार सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी रविकांत वर्पे आणि सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात निषेध नोंदवला. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधीत खात्याचे मंत्री यांच्यावर करवाई व्हावी असे निवेदन दिले.तिवरे धरणाला काही वर्षापासून तडे गेले होते. स्थानिकांनी त्या संबध विभागाला अनेक वेळा निवेदने देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतु या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून आज निष्पाप २३ जणांचा बळी गेला. शासनाला या गोष्टीचे गांभीर्य तर नाहीच, उलट या खात्याचे केबिनेट मंत्री तान्हाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहे. खेकड्यांमुळे धरण फुटले सांगून अंगकाढू पणा हे सरकार करत आहे. खेकड्यांनी हे धरण फोडले असा आरोप संबंधित मंत्री व अधिकारी करत असतील तर त्या खेकड्यांवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

NEET नीटची परीक्षा 21 जूनला होणार

LIVE: आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

महागाईचा धक्का: दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल ३ रुपयांनी महाग, मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ तर सीएनजीच्या दरातही वाढ; नवीन दर जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का, पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिंदे गटाच्या शिंदे सेनेत प्रवेश केला

Nashik TCS Case: धर्मांतर प्रकरणात निदा खानच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावर २५ मे रोजी सुनावणी

पुढील लेख
Show comments