Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी; मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Webdunia
बुधवार, 28 जून 2023 (21:46 IST)
मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून  ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे.
 
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात सध्या दृश्य मानता कमी झाली असून पर्यटकांची गर्दी देखील कमी आहे. मुंबईसह उपनगरात आज जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
 
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही. मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
 
पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होत आहेत.
 
मागील तीन तासात मुंबईत पडलेल्या पावसाची आकडेवारी
ठाणे – 50.04 मिमी
कुलाबा – 54 मिमी
दिंडोशी – 39 मिमी
कासारवडवली – 44 मिमी
डोंबिवली पश्चिम – 35 मिमी
डोंबिवली पूर्व – 31 मिमी
मुंब्रा – 48 मिमी
ऐरोली – 41 मिमी
मुंबई विमानतळ – 38 मिमी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments