Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Webdunia
गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (08:27 IST)
पुणे : राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात आणि दुर्घटना घडत असतात. अशातच पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी रात्री वेगळची घटना घडली. एक ४५ वर्षीय चालक ट्रक चालवत होते. त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागले. वेदना असहाय्य झाल्यानंतर त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला केला. त्यानंतर घरी कुटुंबियांना फोन केला. आपल्या छातीत वेदना होत असल्याचे सांगितले.
 
त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सतपाल झेटिंग कावळे (वय ४५ वर्ष) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
 
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतून पुणे सोलापूर महामार्गावर सतपाल कावळे ट्रक चालवत होता. कर्नाटकावरुन ते हा ट्रक चालवत येत होते. रात्री माळीमळा गावात असताना सतपाल झेटिंग कावळे यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. मग त्यांनी ट्रक महामार्गाच्या एका बाजूला उभा केला. आपल्या कुटुंबियांना मोबाईलवरुन संपर्क केला. त्याच्या घरच्या मंडळींनी तुम्ही जेवण करा, थोडा आराम करा, त्यानंतर जवळपास कुठे डॉक्टर असल्यास त्यांना दाखवा, असे सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

सर्व पहा

नवीन

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सुजाता सौनिक यांची होणार मुख्य सचिव पदी नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

New Army Chief:जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

पासपोर्ट घोटाळा मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी सीबीआयची धाड, 32 जणांवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments