rashifal-2026

26 तोळ्यांचा सोन्याचा राणीहार तुळजाभवानी देवीस अर्पण

Webdunia
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (12:30 IST)
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीस सोलापूरच्या भक्तांनी 26 तोळे सोन्याचा राणीहार गुरूवारी प्रक्षाळपूजेपूर्वी अर्पण केला. आई राजा उदेऽऽ उदेऽऽच्या नामस्मरणात हार प्रशासनातील अधिकारी तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे हा हार दिला. रितसर मंदिराच्या अभिलेखामध्ये नोंद घेण्यात आली. त्यानंतर पाळीचे पुजारी वीरेंद्र कदम यांनी देवीस अर्पण केला. सदर दान देणारे पाच व्यक्ती सोलापूरचे व्यापारी असून त्यांनी देवीला दान केल्यामुळे आमची नावे प्रसिध्द केली जाऊ नयेत, अशी सूचना केली. याप्रसंगी तहसीलदार पाटील, व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, महंत तुकोजी महाराज, पुजारी गब्बर संजय सोंजी, तु.भ. भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पुजारी अतुल मलबा, सचिन परमेश्र्वर, शशिकांत कदम विकास मलबा यांची उपस्थित होती. आपल्या व्यवसायात सतत भरभराट होत असून देवीच्या आशीर्वादाने आम्हाला सदैव यश मिळत राहिले आहे. त्यामुळे आमचे नाव न देता आम्ही ही भेट देवीचरणी अर्पण करीत आहोत, अशा शब्दात हार दान करणार्‍या देणगीदारांनी भावना व्यक्त केल्या. प्रशासनाच्यावतीने देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 26 जानेवारीपासून या मार्गावर धावणार

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

LIVE: भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले

पुढील लेख
Show comments