Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकलमध्ये जुळ्यांचा जन्म

Webdunia
मंगळवार, 1 जानेवारी 2019 (16:36 IST)
मुंबईच्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसुती झाली. या महिलेने चक्क जुळ्यांना जन्म दिला. महत्त्वाचं म्हणजे एका बाळाचा जन्म धावत्या लोकलमध्ये सफाळे स्टेशनजवळ तर दुसऱ्या बाळाचा जन्म पालघर रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालयात झाला.
 
संबंधित महिला प्रसुतीसाठी विरार-डहाणू लोकलने सफाळेवरुन पालघरकडे जात होती. त्यादरम्यान धावत्या लोकलमध्येच तिला प्रसववेदना सुरु झाल्या. लोकलमध्येच तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर लोकल सुटल्याने तिला पालघर रेल्वे स्थानकापर्यंत तसंच प्रवास करावा लागला. पालघर रेल्वे स्थानकात बाळ आणि बाळंतीण महिलेला रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये हलवण्यात आलं. तिथे या महिलेने आणखी एका बाळाला जन्म दिला. आधी मुलीला नंतर मुलाला अशा जुळ्या बाळांना या महिलेने जन्म दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

पिंपरी चिंचवड मधील भारतातील पहिले संविधान भवन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित,महेश लांडगे यांचे विधान

LIVE: ‘शिंदेनी पुन्हा काळी जादू केली!’ आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

महायुतीत वाद असल्याचा अफवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळल्या

राज्यभरात 4 हजार अनधिकृत शाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली

वसतिगृहातील मुलांवरील लैंगिक शोषण प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी केली राज्य सरकार कडे ही मागणी

पुढील लेख
Show comments