Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन मुलींनी तरुणाचा घरात जाऊन केला विनयभंग

Webdunia
गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (15:12 IST)
ऐकावं ते नवलच तरुणीचा विनयभंग झाल्याचं अनेक वेळा ऐकलं असेल मात्र बीडच्या अंबाजोगाई शहरात दोन मुली 30 वर्षीय तरुणाच्या घरी गेल्या, वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला. इतकंच नाही,तर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी दोन तरुणींसह त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
 
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात दोन तरुणींनी एका मुलाच्या मदतीने 30 वर्षीय तरुणाचा विनयभंग केल्याची घटना घडली. अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत राहत असलेल्या 30 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. एका मुलाला घेऊन दोन तरुणी 30 वर्षीय तरुणाच्या घरी गेल्या. वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला. त्यानंतर तरुणींनी त्या तरुणाला शिवीगाळ करत जीवे मरण्याची धमकीही दिली. ही घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत घडली आहे.
 
दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून बबलू बाळू घाडगे, आशा बाळू घाडगे आणि वैशाली श्याम काळम सर्व राहणार लाल नगर, अंबाजोगाई यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
 
दरम्यान या घटनेने अंबाजोगाई शहरात चर्चेला उधाण आले आहे. तसेच गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केली नसल्याने या मुलींना अटक करून न्याय द्यावा. अशी मागणी पीडित तरुणाने केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments