Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर वे वर भीषण अपघातात दोघे ठार; एक जखमी

Webdunia
मंगळवार, 19 एप्रिल 2022 (15:15 IST)
अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर शहरातील दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अहमदनगरमधील प्रसिध्द मुर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय ६२ रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला. तर महापालिकेतील वाहन चालक प्रशांत प्रकाश पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भैरवनाथ यात्रेवरून अहमदनगरकडे परतत असताना चास- कामरगाव घाटात समोर चाललेल्या टेम्पोला कारची पाठीमागून जोरदार धडक बसली.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

जीएमआरटी स्थलांतरित होणार नाही,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संकेत

LIVE: महाराष्ट्रात दारू महागणार

सरकार रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्नात, महाराष्ट्रात दारू महागणार!

सात्विक-चिरागने यु सिन ओंग-ई यी टियूचा पराभव करून मलेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, 2वर्षात 50 अमृत भारत गाड्या चालवल्या जातील

पुढील लेख
Show comments