rashifal-2026

महिन्याला देशी दारूच्या फक्त 2 बाटल्या बाळगता येणार

Webdunia
मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारुबंदीसाठी केलेल्या सुचनांची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे. आता ग्रामीण भागात दारु पिण्याचा परवाना असलेल्या मंडळींना महिन्याला देशी दारुच्या १२ बाटल्यांऐवजी फक्त २ बाटल्याच बाळगता येणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला आहे.
 
उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात ग्रामीण देशी दारुच्या बाटल्या बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. यापूर्वी दारु पिण्याचा परवाना असलेल्या मंडळींना देशी दारुच्या १२ बाटल्या बाळगण्याची परवानगी देण्यात आली होती. अवैध दारुला आळा घालण्यासाठी आणि दारुबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला अनेक उपाय सुचविले होते. दारुच्या बाटल्या बाळगण्याची मर्यादा १२ वरुन दोनपर्यंत कमी करण्याची हजारे यांची सूचना होती. गेल्या आठवड्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशी दारु बाळगण्याची मर्यादा कमी करु असे सांगितले होते. वैयक्तिक सेवनासाठी दोन बाटल्या पुरेशा आहेत, असे सरकारचेही मत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते. मंगळवारी बावनकुळे यांनी परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला.
 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या बारामती येथे अंत्यसंस्कार होणार

अजित पवार यांच्या निधनाने नितीन गडकरी भावूक झाले; म्हणाले- देशाने एक असाधारण नेता गमावला

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांचे पहिले विधान; 'हा अपघात आहे, कट नाही; यावर राजकारण होऊ नये'

Ajit Pawar Death ज्या घड्याळामुळे ते नेता बनले ते घड्याळ मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे साधन बनले

ममता बॅनर्जी यांच्यानंतर खरगे यांनीही विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली

पुढील लेख
Show comments