Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुले आईवडिलांकडे सुखरूपरित्या परत

Webdunia
बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (08:07 IST)
नाशिक :- सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुले आईवडिलांकडे सुखरूपरित्या त्यांच्या ताब्यात दिले. एकाच आठवड्यातील दुसर्‍या घटनेमुळे सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
दोन दिवसांपूर्वी नाशिक मधील मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील हरवलेला मुलगा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे त्याच्या आईवडिलांकडे सुखरूपपणे परत करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पुन्हा एकदा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कता व जागरूकतेमुळे दोन हरविलेली मुले आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.
 
६ फेब्रुबारी रोजी सिन्नर तालुक्यातील माळेगाव फाटा येथील रहिवासी असलेली दोन मुले घरून पळून गेली होती. ही दोन मुले सख्खे भाऊ असून हे दोघे रात्री ८ वाजेच्या सुमारास सिटीलिंक बसमध्ये बसलेली होती. परंतु बसमधील चालक व वाहक यांना या दोन्ही मुलांबाबत संशय आल्याने त्यांनी या दोन्ही मुलांना घेऊन निमाणी बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक प्रवीण कांबळे यांचेकडे सुपूर्द केले.
 
ही दोन्ही मुले शालेय गणवेशात असल्याने त्यानुसार चौकशी करून शाळेशी संपर्क साधण्यात आला व त्यानंतर आई वडिलांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा मुलांचे आई वडील निमाणी बस स्थानक येथे दाखल झाले असता सदर दोनही मुले सुखरूप रित्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.
 
या घटनेनंतर आई वडिलांनी आनंद व्यक्त करतांनाच सिटीलिंक कर्माच्यार्‍यांचे आभार व्यक्त केले. तसेच एकाच आठवड्यात हरवलेल्या तीन मुलांना सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कता व जागरुकतेमुळे आईवडिलांकडे परत पाठविण्यात आल्याने सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या कामाचे देखील कौतुक करण्यात येत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: शरद पवार पक्षात काही मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात

प्रेयसीसाठी डायमंड जडलेला चष्मा ऑर्डर केला, 13 हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने केली 21 कोटींची फसवणूक

शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट शिवसैनिकांनीच रचला होता का? पोलिसांनी दोघांना अटक केली

एकनाथ शिंदे आणि पंतप्रधानांच्या भेटीवरून चर्चेचा बाजार, काय म्हणाले उपमुख्यमंत्री जाणून घ्या

शरद-अजित एक होणार, 8 आणि 9 जानेवारीला बोलावली महत्त्वाची बैठक, नव्या वर्षात ज्येष्ठ पवार घेणार मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments