Dharma Sangrah

कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल

Webdunia
बुधवार, 6 जुलै 2022 (07:53 IST)
कोल्हापूर, : संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या २ तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा ९ च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार, शरद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
 
एनडीआरफच्या २ तुकड्यांपैकी एक तुकडी कोल्हापूर शहरात तर दुसरी तुकडी शिरोळ तालुक्यात काम करेल. प्रत्येक तुकडीत २५ जवानांचा समावेश आहे.
निरीक्षक बृजेश कुमार रैकवार आणि शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील टीम काम करेल. तर निरीक्षक लोकेश रत्नपारखी व प्रशांत चिता यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ येथील टीम काम करणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कांदा लागवड तंत्रज्ञान: लागवडीपासून कांदा चाळीपर्यंतची ए टू झेड माहिती

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

आखाती युद्धाचा परिणाम: पुणे-दुबई-अबू धाबी विमानसेवा बंद, २ हजार प्रवाशांवर परिणाम

नागपूर-अमरावती एसटीचा होणार नूतनीकरण, गणेशपेठ बसस्थानकात आता विमानासारखी सुविधा मिळणार

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

पुढील लेख
Show comments