Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन वर्षाच्या चिमुरड्याला सिगारेटचे चटके; देवळाली गावातील अमानुष प्रकार

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (15:07 IST)
नाशिक : ‘मला तुझ्यापासून मुलबाळ होऊ दे’, अशा विचित्र मागणी नकार देणा-या विवाहित महिलेसह तिच्या अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरड्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुलाला ठिकठीकाणी सिगारेटचे चटके दिल्याचा अमानुष प्रकार देवळाली गाव परिसरात घडला आहे. या संतापजनक घटनेप्रकरणी पीडित विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर बुधवारी (दि.६) संशयित बाबासाहेब भगवान कपाटे (वय ३०) रा. अंधारी पळशी. ता. सिल्लोड, जि औरंगाबाद हल्ली रा.रमाबाई आंबेडकर नगर, गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव याच्या विरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
 
या अमानुष घटनेतील संशयित बाबासाहेब कपाटे यांनी फिर्यादी विवाहित वीस वर्षीय महिलेकडे ‘मला तुझ्यापासून मुलबाळ होऊ दे’ अशी विचित्र मागणी केली जात होती. संशयिताच्या या मागणीला पीडित विवाहितेने नकार दिल्याच्या रागातून संशयित बाबासाहेब कपाटे याने पीडित महिलेसह तिच्या दोन वर्षाच्या मुलाला हाताचापटीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याशिवाय मुलगा शौर्य (वय २) याला गेल्या काही दिवसांपासून ठिकठीकाणी सिगारेटचे चटकेही दिले. पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर संशयिताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक वाय.डी. देवरे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

निवडणूक निकालानंतर सेन्सेक्स 1290 अंकांनी वधारला, तर निफ्टीने 24300 चा टप्पा पार केला

मेक्सिकोमध्ये एका बारमध्ये गोळीबार, सहा जणांचा मृत्यू

IPL Auction: लिलावात पंत बनला सर्वात महागडा खेळाडू

भाजलेले चणे खाल्ल्यानंतर रक्ताच्या उलट्या झाल्या, आजोबा आणि नातवाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments