Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे

Webdunia
“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर हात उगारू नका पण कोणी जर अंगावर हात उगारला तर तो जागेवर ठेवू नका. या शिकवणीच्या अंमलबजावणीची सुरूवात जर आम्ही केली तर मग हे जे कोणी नामर्द हल्लेखोर आहेत ज्यांनी एकट्या दुकट्याला गाठून गोळ्या घालून , गळा चिरून हत्या केली आहे या नामर्दांच्या अवलादीला महाराष्ट्रामध्ये ठेचून टाकू.”असे  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 
 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडगांव येथे दुहेरी हत्याकांडात मारले गेलेले संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबांना वाऱ्यावर सोडणार नाही. या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. त्यांना संपूर्ण ताकद आणि आधार शिवसेना देईल असे स्पष्ट शब्दात सांगितले. यावेळी त्यांनी नगरमधील गुंडगिरी त्यांना असलेला राजकीय वरदहस्त याच्यावर सडकून टीका केली. मंत्र्यांनी अधिकार दाखवला तर सहकारी मंत्र्यांच्या अधिकाराबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर मला वाटतं की हे सरकार ‘निकम्मं’ आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments