Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला आणि शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे, उद्धव ठाकरेंची अमितशाह यांच्यावर घणाघाती टीका

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (16:41 IST)
अमित शहांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे, उद्धव ठाकरेंची अमितशाह यांच्यावर घणाघाती टीका 
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांनी नुकतेच महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात त्यांनी भाजपच्या संघाला निवडणुका जिंकण्याचा मूळ मंत्र दिला.

पूर्व महाराष्ट्रात नागपुर जिल्ह्यातील रामटेक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी अमितशाह  यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, आमचे सरकार सत्तेत आल्यावर राज्यात होणारी लूटमार, गुंडगिरी थांबवणार आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहे.

माझ्या सरकार मध्ये गुजरात मध्ये प्रकल्प गेल्याची माहिती ऐकण्यात आली नाही. मुंबईचे आर्थिक केंद्र देखील गुजरात मध्ये गेले आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राला लुटण्यापासून वाचवण्यासाठी आहे. 
अमितशहा नागपुरात आले असता त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली.

विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे उद्धेश्य महाराष्ट्रातून शरद पवार आणि मला राजकीय दृष्टया संपवायचे आहे. फक्त माझी जनताच मला संपवू शकते, अमित शहा नाही.असं म्हणत त्यांनी भाजपवर आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला.
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

देशातील २२ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा

नागपूरच्या उमरेड एमआयडीसीच्या अॅल्युमिनियम कारखान्यात भीषण स्फोट, 5 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई पोलीस एनआयएला पूर्ण सहकार्य करतील

LIVE: फडणवीस म्हणाले मुंबई पोलिस एनआयएला पूर्ण सहकार्य करतील

आयएसएल कपच्या अंतिम फेरीत मोहन बागानचा सामना बेंगळुरू एफसीशी होणार

पुढील लेख
Show comments