"मुंबईवर गिधाडे फिरू लागलीत. मुंबई गिळायचीय, लचका तोडायला देणार का? नवीन नाही. शिवाजी महाराजांपासूनच्या काळापासून सुरू आहे. आम्हाला जमीन दाखवणार आहेत, ही गवताची पाती नाहीत, तलवारीची आहेत" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच "नगरसेवकांना सांगतोय जायचं असेल तर आताच जा" असंही भर सभेत स्पष्टच सांगितलं आहे.
"शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत ३०-४० आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे. नगरसेवकांनाही सांगतोय तुम्हाला जर जायचं असेल तर आताच जा" असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असे समजून कामाला लागा. प्रत्येक शाखा उघडी असायला हवी. त्या शाखेत गटप्रमुखही असायला हवेत असंही म्हटलं आहे.
"हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा"
"पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय. अमित शाह यांना आव्हान, मुंबई महापालिका निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, त्याहून हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा" असं आव्हानही ठाकरेंनी दिलं आहे. तसेच "शिंदेंच्या सरकारला फिरण्याची सवयच झालीय.