suvichar

जनतेचा 'सर्जिकल स्ट्राइक' भारी पडेल

Webdunia
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (10:41 IST)
मोदी सरकारच्या ५०० आणि १०००च्या नोटा बदलण्याच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. काळा पैसा बाहेर यायला हवा यात दुमत नाही, मात्र केंद्र सरकारने घेतलेला अचानक नोटा बदलण्याचा निर्णय चुकीचा असून यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काळ्या पैशावर 'सर्जिकल स्ट्राइक' करणाऱ्यांविरुद्ध एक दिवस सर्वसामान्य जनता जो 'सर्जिकल स्ट्राइक' करेल तो सरकारला भारी पडेला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
 
मोदी सरकारच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटा बंद करून 'सर्जिकल स्ट्राइक' केला असे म्हटले जाते. मात्र, केंद्र सरकार स्वीस बँकेवर 'सर्जिकल स्ट्राइक' कधी करणार, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या नोटा बंद करण्याच्या हेतूवर अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित केली आहे. 
 
जनतेला रस्त्यावर आणून मोदी जपानला 
या निर्णयामुळे नेत्यांना नव्हे तर सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. जनतेला रस्त्यावर आणून मोदी जपानला गेले अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर, माफी मागणार नाहीत, खटल्याला सामोरे जातील

LIVE: मुस्लिम समुदायासाठी 5% आरक्षण रद्द ,महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी निधी जारी

पुण्यात आईच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

राहुल चहर आणि ईशानीचे लग्न संपुष्टात आले, सोशल मीडियावर घटस्फोटाची माहिती दिली

पुढील लेख
Show comments