Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ulhasnagar :चालत्या स्कूटीवरून सार्वजनिक ठिकाणी जोडप्याची अंघोळ व्हिडीओ व्हॉयरल

Ulhasnagar
Webdunia
शुक्रवार, 19 मे 2023 (11:07 IST)
सोशल मीडियावर लोक रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असतात. काही वेळा लोक नियमांचेही उल्लंघन करतात.  हाराष्ट्रातील उल्हासनगरमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपे चालत्या स्कूटीवर बादली ठेवून अंघोळ करत होते चौकाचौकात दोघांनी हे कृत्य केल्यावर लोकांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
महाराष्ट्रातील उल्हासनगरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उल्हासनगरचा आहे, जिथे चालत्या स्कूटीवर एक मुलगा आणि मुलगी चौकाचौकात बादली ठेवून आंघोळ करत होते. 
'चुभती जलती गरमी का मौसम आया' या गाण्यावर तरुण-तरुणी रील बनवत  होते. 
 
या दोघांनी स्कूटी घेऊन शहरातील रस्त्यांवर फिरून व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली 
 
महाराष्ट्रातील उल्हासनगर सेंट्रल पोलिस स्टेशनमध्ये तरुण आणि तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श शुक्ला हा स्कूटीवर स्वार असलेला तरुण असून त्याच्यासोबत एक 22 वर्षीय तरुणीही होती. उल्हासनगरमधील श्रीराम थिएटरच्या मागे असलेल्या आनंद नगरमध्ये आदर्श शुल्ला आपल्या कुटुंबासह राहतो तो इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून पोस्ट करत असे. यावेळी उल्हासनगरमध्ये तापमान 40 अंशांवर पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी आदर्शने 22 वर्षीय तरुणीसोबत 'चुभती जलती गरमी का मौसम आया' या गाण्यावर रील बनवला होता. 
 
आदर्श आणि 22 वर्षीय तरुणी दुपारी स्कूटीवरून शहरात निघाले होते. दोघांनी स्कूटीवर पाण्याने भरलेली बादली ठेवली होती. शहराच्या चौकात आल्यानंतर हे जोडपे स्कूटीवरच अंघोळ करू लागले.  यादरम्यान चौकातून जाणाऱ्या लोकांनी मोबाईलवरून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.  हा व्हिडिओ कल्याण अंबरनाथ मार्गावरील सेक्टर 17 मेन सिग्नलचा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 
 
व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलीस हवालदार जगदीश छबीलाल महाजन यांच्या तक्रारीवरून आदर्श आणि त्याच्या 22 वर्षीय मित्राविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम129 आणि भादंवि कलम 279 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दोघांनी हेल्मेट न घालता सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. बेदरकारपणे स्कूटी चालवली. 
 
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत एका यूजरने लिहिले की, 'हे उल्हासनगर आहे. मनोरंजनाच्या नावाखाली अशा कृत्यांना परवानगी आहे का?  

उल्हासनगर सेक्टर-17 या सर्वात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मुख्य सिग्नलची ही स्थिती आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल. 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे शहर पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत पोस्टला मराठी भाषेत उत्तर दिले. पोलिसांच्या वतीने लिहण्यात आले आहे, तुमची माहिती वाहतूक नियंत्रण कक्ष ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी देण्यात आली आहे.

Photo- Social Media


Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: Alert ! पश्चिम रेल्वेने मुंबईतील एसी लोकल गाड्यांबाबत मोठी अपडेट, तारखा आणि मार्ग तपासा

‘बघ न बेबी मी काय केले’ नागपुरात एकतर्फी प्रेमात प्रियकराने मुलीच्या नातेवाईकाची दिवसाढवळ्या हत्या केली

कुणाल कामराला दुसरे समन्स जारी, मुंबई पोलिसांनी त्याला या तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले

Alert ! पश्चिम रेल्वेने मुंबईतील एसी लोकल गाड्यांबाबत मोठी अपडेट, तारखा आणि मार्ग तपासा

मुंबईत ५ एप्रिलपासून क्लीन अप मार्शल सेवा बंद होणार

पुढील लेख
Show comments