suvichar

वेण्णालेक धरणाला भगदाड, जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न सुरु

Webdunia
साताऱ्यातील वेण्णालेक धरणाला भलमोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळे पाणी गळती थांबविण्यासाठी भगदाडात जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न रात्रीपासून सुरु आहे. त्यासाठी तब्बल दोन ट्रक जुने कपडे वापरण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. यापूर्वीही वेण्णालेक धरणातून पाण्याची गळती सुरु होती. मात्र तेव्हा तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आता पुन्हा एकदा धरणातून गळती सुरु झाली आहे.
 
पर्यटकांचं आकर्षण असलेलं आणि महाबळेश्वर, पाचगणीसह सुमारे 25 गावांना पाणी पुरवठा करणारं वेण्णा लेकला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. मात्र त्यावेळी संबंधित प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. नाही म्हणायला महाबळेश्वर गिरिस्थानच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांनी वेण्णा लेकला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. 2001 मध्ये 56 कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक बांधण्यात आले आहे. तर चार वर्षापूर्वी आमदार फंडातून  तीन कोटी रुपये खर्चून या लेकची किरकोळ गळती बंद करण्यात आली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पुण्यात प्रवासी भाड्यावरून ऑटोचालकावर जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी

LIVE: विदर्भ-मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट

विदर्भ-मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट, तर कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नागपुरात डिझेलच्या कमतरतेचे कारण देत बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलिसांचा नकार

सरकार मंदिरांचे सोने जप्त करणार का? संकटाच्या काळात 'सुवर्ण मुद्रीकरण' अफवांवर अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments