Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'अवयव विक्रीला काढले तरी लाज नाही...' शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेरलं

Vijay-Wadettiwar
Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2023 (20:21 IST)
नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा झाली. दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केला.
 
दरम्यान "सरकारने ट्रीगर एक मध्ये 194 तालुके असताना केवळ 40 तालुकेच दुष्काळी घोषीत केले. यावेळी सरकारने केवळ एमआर-सॅक व महा-मदत ही संगणक प्रणालीचा आधार घेतला. पण शेतकऱ्यांचे अश्रू पाहिले नाहीत. शेतकऱ्यांनी आपले अवयव विकण्यासाठी काढले आहेत. तरी सरकारला लाज वाटत नाही..." अशी टीका यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली.
 
तसेच "शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत अपेक्षित नाही. सरसकट हेक्टरी किमान ५० हजार रूपये आणि बागायतीखालील क्षेत्राकरिता प्रति हेक्टरी किमान १ लाख रूपये तात्काळ मदत देण्याची आवश्यकता आहे. 24 ऑगस्टला 2023 आम्ही दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारला पत्र दिले. पण सरकारला जाग आली नाही. कर्नाटकच्या धर्तीवर सरकारने अर्ली ड्रॉट जाहीर केला असता तर शेतकऱ्यांचे भले झाले असते..." असे वडेट्टीवार म्हणाले.
 
महाराष्ट्रात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. "देशातील जवळपास 37 टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. राज्यात सुमारे 3000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकार गंभीर नाही.
 
शेतकरी होरपळला असताना तुम्ही नियम, निकष, जीआरची भाषा करता. जीआर, नियम, निकष शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करत असतील तर बदलले पाहिजेत.." अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले.
 
"आस्मानी संकटाबरोबरच तुमच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. तरी देखील तुम्ही उजळ माथ्याने राज्यात फिरताय. उरली सुरली थोडी शिल्लक असेल तर शेतकऱ्यांसाठी ठोस मदत जाहीर करा. पीकविमा कंपन्यांचे मुजोर प्रतिनिधी शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. अपमानास्पद वागणूक देत आहेत.." अशी जहरी टीका  यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पोकळ आश्वासने देणे थांबवा, आम्ही हिंदुत्व सोडले आहे की तुम्ही? उद्धव ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला

पालघर : डोळ्यात तिखट फेकून दरोडेखोरांनी लाखो रुपये लुटले, पोलिसांनी लग्न निमंत्रण पत्रिकेच्या मदतीने गुन्ह्याची उकल केली

वनमंत्री गणेश नाईक ४ एप्रिल रोजी वाशी येथे जाहीर सभा घेणार

पुढील लेख
Show comments