suvichar

पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (15:25 IST)
बारावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीवर राज्यातील शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. यामुळे आता परीक्षा निकाल वेळेत लागणार आहे.
 
आजपासून  पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पेपर तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बहिष्कार टाकला होता. शासकीय आदेश दिल्यामुळे मागण्यांबाबत या क्षणापासून आंदोलन मागे घेत असल्याचं शिक्षक महासंघाने जाहीर केलं.
 
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली होती.
 
तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका बारावीच्या विविध विषयांच्या तपासणीविना पडून होत्या.शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली नव्हती. नियमानुसार पाच जूनपूर्वी बारावीचा निकाल लावणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मोठा तिढा सुटला आहे. यामुळे आता सर्व सुरळीत होईल असे चिन्हे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात चोरी

अभिषेक शर्माने एका मोठ्या शतकासह ऑरेंज कॅप पटकावली

Volleyball Federation of India राजकारणामुळे भारतीय व्हॉलीबॉल महासंघाची मान्यता रद्द

माकडाने तीन महिन्यांच्या चिमुकलीला दोन तास कैदेत ठेवले, त्यानंतर तिची धक्कादायक सुटका

लग्नासाठी तरुणाने, पोलीस भरतीची खोटी बातमी पसरवली आणि स्वतःचे पोस्टर्स लावले; गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments