Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (08:16 IST)
ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा. राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.  

श्री. मदान यांनी सांगितले, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यते, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments